पुणे- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे पुणे आळंदी येथील काटेवस्ती वरील जगताप मंगल कार्यालयात दु.12.30 वाजता चळवळीचे कार्यकर्ते शिवश्री गणेश सुरेश मोरे, पाटण, सातारा आणि शिवमती मृणाली ज्ञानेस्वर लांजे यांचा सत्यशोधक विवाह महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य रघुनाथ ढोक आणि शिवविवाह पद्धतीने संपादक गंगाधर बनबरे यांनी मोफत विवाह लावला. यावेळी जिजाऊ वंदना आणि मंगलाष्टक मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यां सुवर्णा बनबरे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रा. सुदाम धाडगे यांनी म्हटली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे मनपाचे उपआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राजेंद्र कुंजीर, विठ्ठलराव जाधव बहुउद्देशीय केंद्राचे प्रमुख आकाश ढोक उपस्थित होते.
गंगाधर बनबरे, रघुनाथ ढोक,सुदाम धाडगे यांनी यावेळी प्रबोधन करताना समाजाने या पद्धतीने विवाह का करावा,अनाठायी खर्च कसा वाचवावा,आणि आपली खरी जुनी संस्कृती तसेच महापुरुषाने जे महानकार्य करून ठेवले त्याचे खरे अनुकरण करा ,अन्नाची नासाडी करू नका म्हटले. या ठिकाणी वधु वर यांनी दोघांनी तिरंगा फेटा वापरून पुरुष महिला समान आहेत तसेच अक्षता म्हणून तांदूळ न वापरता पुलांचा,टाळ्यांचा वापर करून सर्वाना महापुरुषांचे जीवनचरित्राचे ग्रंथ आणि फुल,फळ,व इतर झाडे देऊन एकमेकांनी पर्यावरण वाचवा,एकमेकांना ग्रंथ भेट द्या हा संदेश दिला. हा विवाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एक होऊन समाजाला दोन्ही कुटूंबाने एक आदर्श दाखवून दिल्याने विवाह सोहळ्याचे अनेकांनी कौतुक करून पुढील पिढीने याच पद्धतीने विवाह करू असे सांगितले.
या प्रसंगी बनबरे आणि ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक आणि शिवविवाह प्रमाणपत्र तसेच युगपुरुष शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले, स्री शिक्षणाचे आद्यप्रनेत्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ,भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि दोघांना फुलझाडे भेट दिली. तर शिवविवाह लावला म्हणून आणि समाजाला शिवविवाह ही चांगली सोफी पद्धत सुवर्णा गंगाधर बनबरे यांनी दिली म्हणून त्यांचा सत्कार रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा, ग्रंथ आणि फळझाड भेट दिले.
यावेळी मंचावर वधु वर यांचे आईवडील मामा मामी यांना सन्मानाने बसवून गणेश मोरे आणि मृणाली लांजे यांचे शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास हार अर्पण केला तसेच इतर महापुरुषांचे प्रतिमा यांना आई वडिलांचे हस्ते पुष्पहार घालून विवाहाला सुरुवात केली. याप्रसंगी वर गणेश मोरे यांनी देहदान करणार असल्याचे सांगितले, या विवाहासाठी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले समता परिषद व चळवळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उच्चशिक्षित गणेश मोरे आणि मृणाली लांजे यांचा सत्यशोधक व शिवविवाह पद्धतीने विवाह सम्पन्न
Related tags :
Subscribe
Login
0 Comments