मुंबई– (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), योगेश गोगावले (पुणे) आणि अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भाजपच्या पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांची तर, पुणे शहर सरचिटणीसपदी गणेश बिडकर निवड करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर, उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्षांनी काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे : पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे : मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. .
अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे पुढील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. यात प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते यांचा समावेश आहे.