पुणे – (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
समर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुचाकीचोर जाळ्यात सापडला. त्याच्याकडून चोरीची 90 हजाराची दुचाकी हस्तगत केली. गाडीस नंबर प्लेट न लावता तो तिचा वापर करत होता. अश्रफ मुजावर असे दुचाकीचोराचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस नाईक टिळेकर, पोलीस शिपाई सचिन पवार, शिंदे, शेख, निलेश साबळे असे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यांना नेहरु रस्त्यावर एक तरुण यामाहा आरवन दुचाकीवर जात असलेला दिसला. त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पोलीस कर्मचारी सचिन पवार यांनी त्याला थांबवले. संशय आल्याने त्याच्याकडे नंबर प्लेट आणि कागदपत्रांची चौकशी केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्याकडे अधिक चौकशी करता, गाडी चोरीची असल्याचे उघड झाले. ही दुचाकी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल आहे. यामुळे अश्रफ मुजावरला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
समर्थ पोलिसांची कामगिरी ; सतर्कतेमुळे वाहन चोर सापडले जाळ्यात
Related tags :
Subscribe
Login
0 Comments