पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारच्या वतीने घेण्यात आला या चुकीच्या निर्णया विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार वाडा भाड्याने देणे आहे असे अभिनव पद्धतीचे आंदोलन शनिवारी वाड्यासमोर करण्यात आले. यावेळी यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की तुम्ही वर्ग 2 चे किल्ले भाड्याने देणार असे म्हणत आहात, शनिवारवाडा हा तर किल्ला पण नाहीये त्यामुळे आपण शनिवारवाडा भाड्याने द्यावा यासाठीचे एजंट शुल्क व पार्किंग शुल्क मुख्यमंत्री, पालकमंत्री, पर्यटनमंत्री यांनी घ्यावे. भाजप सरकारने हा तुघलकी निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा त्यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या गड-किल्ल्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील जनतेचा हात सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय लवकरात लवकर मागे घेतला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेवक वनराज आंदेकर, काकासाहेब चव्हाण, राकेश कामठे, महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, युवक अध्यक्ष महेश हांडे, सामाजिक न्याय अध्यक्ष बापू डाकले, श्रीकांत पाटील, प्रदीप देशमुख, गणेश नलावडे, राजेंद्र खांदवे, मनोज पाचपुते, फहीम शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
लग्न, मुंज,डोहाळे जेवण,या कार्यक्रमासाठी शनिवारवाडा भाड्याने मिळेल ; राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन
Related tags :
Subscribe
Login
0 Comments