हडपसर : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
रयतच्या च.बा.तुपे साधना कन्या विद्यालयातील १४ वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने तर गर्ल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १७ वर्षे वयोगटाखालील संघाने श्री नागेश्वर विद्यालय वरवंड येथे झालेल्या तालुकास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत दोन्हीही संघाने अव्वल स्थान राखत प्रथम क्रमांक मिळवला . यावेळी विजय संघातील खेळाडूंचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा.श्री दिलीप आबा तुपे ,मा.श्री चेतन दादा तुपे, विभागीय अधिकारी मा.श्री.किसनराव रत्नपारखी, विद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ सुजाता कालेकर, कराटे प्रशिक्षक श्री.विजय फरगडे व परिसरातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले . यावेळी विद्यार्थिनींचे कौतुक करताना विभागिय अधिकारी मा.श्री. किसनराव रत्नपारखी म्हणाले विद्यार्थिनींनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थान निर्माण करणे गरजेचे असल्याने प्रचंड जिद्द,चिकाटी,आणि मेहनत घेतली तर तुम्ही सहज विजय मिळवत राज्यस्तरापर्यंत पोहचू शकता . भविष्यात एक उत्तम क्रीडापटू होण्यासाठी सातत्य ठेवा.
यावेळी विद्यालाचे उपमुख्याद्यापक श्री ए.एन पिसे, पर्यवेक्षक सौ. कुंभार पी व्ही, सौ.साबळे एम.आर , सौ पवार सी .एस तसेच उपशिक्षक श्री कांबळे एस.के., श्री मोरमारे एस.टी. आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयाचे कबड्डीत यश : तालुकास्तरीय खुल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक :

Related tags :
Subscribe
Login
0 Comments