नाशिक (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
महाराष्ट्र दंतचिकित्सक असोसिएशनच्या वतीने गेले वर्षभर चांगले उपक्रम राबविल्याबद्दल इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे, सचिव डॉ. अक्षय राऊत, खजिनदार डॉ. आनंद भन्साळी, उपाध्यक्ष डॉ. स्मिता झांजुरणे व डॉ. सौरभ बिर्ला यांनी पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्रातील 62 ब्रांच मधून हडपसरच्या ब्रांचला हा डॉ.वसंत कोटक ट्रॉफी सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र वैद्यकीय असोशियन चान्सलर डॉ. दिलीप म्हैसकर, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे पार पडला.
इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये वृद्धाश्रममध्ये वृद्धांनाआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच या वर्षात महाराष्ट्रातील सर्व शाखांचे मिळून राज्यस्तरीय बॅडमिंटन, कॅरम, चेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
तसेच स्कुलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले. डॉक्टर सदस्य व कुटुंबियांसोबत पुरंदर येथे ट्रेकचे देखील आयोजन केले अशी माहिती अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे, सचिव डॉ.अक्षय राऊत यांनी दिली.
Facebook Page Link
#इंडियनडेंटलअसोसिएशनहडपसरशाखेलापुरस्कार#नाशिक येथे दिमाखदार सोहळ्यातडॉ.जयदीप फरांदे, डॉ.अक्षय राऊत, डॉ. आनंद भन्साळी…
Posted by Rokhthokmaharashtra on Thursday, December 19, 2019