वानवडी / पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार वानवडी पोलिसांनी तत्परतेने
एक इसमास ताब्यात घेतले त्याकडून
दोन गावठी बनावटीचे कट्टे व तीन काडतुसे असा 40 हजात किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
वानवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांती कुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप गुरव यांना बातमीदार यामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पुणे शहरातील सराईत गुंड संतोष नातू हा लुल्ला नगर चौक ते गोळीबार मैदान चौकाच्या दरम्यान असलेल्या लिटिल इटली या हॉटेलच्या समोरच्या बाजूस उभा असून त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे त्यामध्ये पिस्टल असून तो विक्री करण्याकरता घेऊन आला आहे अशी माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलिस हवालदार दत्तात्रय तेलंग, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गिरमकर, शिरीष गोसावी, पोलीस नाईक सुदर्शन बोरावके, पोलिस नाईक युवराज दुधाळ, पोलिस शिपाई गणेश खरात यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावला मिळालेल्या माहितीप्रमाणे एक इसम उभा असल्याची खात्री झाल्यानंतर त्यास पकडून त्याच्या हातातील पिशवीची झडती घेतली असता यामध्ये दोन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतूस असा सुमारे 40 हजार 900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीचे नाव संतोष विनायक नातू वय 43 रा. जांभळे पॅलेस जवळ, महर्षीनगर पुणे, असे असून अधिक चौकशी करता तो स्वारगेट पोलीस स्टेशन कडून दोन वर्षाकरता पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती पुढे आली.
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त शसुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गुन्हेचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांचे सुचनेनुसार वानवडी तपास पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, हवालदार दत्तात्रय तेलंग, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गिरमकर, सुदर्शन बोरावके, युवराज दुधाळ, शिरीष गोसावी, गणेश खरात यांनी सदरची कारवाई केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप गुरव करीत आहेत.
Facebook Page Link
https://www.facebook.com/270875513728685/posts/581830855966481/