पुणे

पुणे – नाशिक महामार्गावरील कामे तात्काळ पूर्ण करा : खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे , दि 03 : पुणे -नाशिक, पुणे – नगर महामामार्गवरील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून यामध्ये  सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे ,  या कारणास्तव आज शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली , वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर चालू असलेले प्रकल्प पूर्ण करा अश्या सूचना त्यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
       वाहतूक कोंडीची समस्येवर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता , सोबतच चाकण या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी केली होती त्याच मागणी संदर्भात आज चालू असलेला कार्यवाही संदर्भात आढावा घेतला ,  जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली , यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे , शिरुर- हवेली मतदारसंघाचे आमदार ऍड अशोकबापू पवार , भूसंपादन समन्वयक अधिकारी सारंग कोडलकर , राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.
     वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे , सोबतच शेतकऱ्यांचा जमिनी  अधीग्रहण करण्यात आल्या आहेत व काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता सर्वांचा विचार करून जमीन मालकांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा , तसेच दोन्ही मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
     नारायणगाव बायपासचे सुरू असलेले काम पूर्ण होत आले असून यामधील एक लेन लवकर सुरू करण्यात यावी अशी सूचना संबधीत ठेकेदाराला खासदारांनी केली , या मार्गवरील भूसंपादनाची कामे लवकर पूर्ण झाल्यास रस्त्याचे रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल , वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता भूसंपादन अधिकाऱ्यांनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गतीने कामे करावीत, अशा सूचना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिल्या.
     यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, संबधित भूसंपादन अधिकारी, जमिन मालक, शेतकरी
उपस्थित होते.

Facebook Page Link

https://m.facebook.com/story.php?story_fbid=118200209684076&id=112080646962699

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x