संभाजी ब्रिगेड-आपल्या दारी या उपक्रमा च्या माध्यमातून शिवमती सविता अनिल मोरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सविता मोरे जिजाऊ- सावित्री- अहिल्या यांचा परिवर्तनवादी विचार घेऊन त्या समाजात महिलांसाठी महिला सक्षमीकरण आणि आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांच्या या परिवर्तनवादी विचारांच्या सामाजिक कार्याची संभाजी ब्रिगेडने दखल घेऊन त्यांना राष्ट्रमाता राजमाता मा साहेब जिजाऊ जयंती च्या निमित्ताने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा पुरस्कार देऊन त्यांच्या घरी जाऊन संभाजी ब्रिगेड आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे शहर कार्याध्यक्ष संदीप लहाने पाटील, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष शरद वारे, संघटक नितीन जाधव, सचिव तात्यासाहेब घिगे, संघटक नवनाथ गुंजाळ, विशाल लहाने पाटील, उमेश शिंदे, अभिजित भाट, अमोल जाधव तसेच सर्व मोरे कुटूंबीय आणि त्यांच्या परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुरस्काराने सामाजिक जबाबदारी वाढली…….
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना महिलांना स्वाभिमानाने जगण्यास शिकविले, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची गरज आहे, महिला बचत गट सक्षम व्हावेत म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार तसेच सामाजिक कार्यात पुढाकार घेणार
सौ.सविता अनिल मोरे
उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस – हडपसर