राजकीय वर्तुळात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे वाद चांगलाच पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील भाष्य केलं आहे. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘कार्पोरेट विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे तेवढे लुटण्याची परवानगी देणारे पंतप्रधान मोदी कुठे? आणि शेतकऱ्याच्या बांधावरुन जात असताना गवताच्या काडीला जरी धक्का लागला तर हात कलम केले जातील असे सांगणारे शिवाजी महाराज कुठे? त्यामुळे मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अशक्य असल्याचे शेट्टी म्हणाले.
वादग्रस्त पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना नरेंद्र मोदींशी करण्याची हिम्मत लेखक जय भगवान गोयल यांची कशी झाली? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरुन सुरु असलेला वाद म्हणजे षडयंत्राचा भाग असल्याचे शेट्टी म्हणाले.

दरम्यान, आजच्या घडीला शेतकऱ्यांची दुरावस्था पाहता शिवाजी महाराज असते तर त्यांनी राज्यकर्त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले असते अशी खोटक टीका शेट्टींनी केली. याचप्रमाणे सैन्य शेताच्या बांधावरुन जात असताना शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अन्यथा हात कलम केले जातील असा इशारा शिवाजी महाराज देत होते, असे शेट्टी म्हणाले.