हडपसर /पुणे (प्रतिनिधी)
थोर समाजसेवक डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या नावाने सामाजिक क्षेत्र व वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी बद्दल देण्यात येणार्या पुरस्कारार्थींची नावे महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार डॉ.अजय चंदनवाले – अधिष्ठाता बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून जनरल हॉस्पिटल पुणे यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. चंदनवाले यांनी ससून जनरल हॉस्पिटल मध्ये अनेक आधुनिक वैद्यकीय सेवा व सुविधा उपकरणे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत यासाठी विविध कंपन्यांच्या सी.एस.आर च्या निधीच्या सहायाने ससून जनरल हॉस्पिटल चा कायापालट केला आहे व त्यांची अव्याहत सेवा चालू आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार यजुर्वेन्द्र
महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव यांना जाहीर करण्यात आलेला आहे यजुर्वेन्द्र महाजन हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक असून दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत, दिव्यांगाना, आदिवासी वंचीत युवक-युवतींसाठी गेली 14 वर्षे ते कार्यरत आहेत. त्यांनी अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा उद्योजकता विकास यासाठी निवासी प्रकल्प उभारला आहे
हे पुरस्कार डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दिनांक 2 मार्च 2020 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन जवळ, वानवडी पुणे येथे संध्याकाळी पाच ते सात वाजता होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादा गुजर यांच्या स्मृतिदिनी सोमवार 2 मार्च 2020 रोजी साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिव अनिल गुजर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. सि. तु. तथा दादा गुजर पुरस्कार जाहीर डॉ.अजय चंदनवाले, यजुर्वेन्द्र महाजन यांना पुरस्कार
Related tags :
Subscribe
Login
0 Comments