पुणे

साधना कन्या विद्यालयाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश

साधना कन्या विद्यालयाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश

हडपसर वार्ताहर ; राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या सन 2019-20 या वर्षातील एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड या शासकीय रेखाकला परीक्षेत रयतेच्या चं.बा तुपे साधना कन्या विद्यालयाचा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा शेकडा निकाल 97.54 यामध्ये 285 विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या त्यापैकी 278 उत्तीर्ण झाल्या असून ‘अ’ ग्रेड मध्ये 3 तर ‘ब’ ग्रेड मध्ये 10 विद्यार्थिनी आहेत.तसेच इंटरमिजीएट परीक्षेचा शेकडा निकाल 98.36 आहे. या परीक्षेसाठी 184 विद्यार्थिनीं प्रविष्ठ झाल्या होत्या त्यापैकी 181 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून ‘अ’ ग्रेड 15 तर ‘ब’ ग्रेड मध्ये 58 विद्यार्थिनी आहेत.सदर परीक्षेचे ग्रेडनुसार गुण इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेत धरले जाणार असल्याने याचा विद्यार्थिनींना फायदा होणार असल्याचे प्राचार्या सौ सुजाता कालेकर यांनी सांगितले. विद्यालयातील चित्रकला विभागाचे प्रमुख श्री पृथ्वीराज परदेशी, श्री संजय गोसावी , श्रीमती सारिका कोलते , सौ प्रियांका राऊत या कला शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x