पुणे

#वैदू_समाजातील_लक्ष्मण_शिंदे_यांना_महापौरांच्या_हस्ते_पुरस्कार #महापालिकेत_झालं_सन्मान

पुणे (प्रतिनिधी)
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे महापालिका यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल लक्ष्मण शिंदे यांना पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्नी, अखिल महाराष्ट्र वैदू समाज सदस्य, मित्र परिवार, पुणेकर नागरिक उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रातील हा पहिला पुरस्कार असून हा पुरस्कार मी‌ माझे वडिल कै.लक्ष्मण सिद्धू शिंदे यांना समर्पित करत आहे. मला आमच्या राष्ट्रसेवा दल मुळे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. राष्ट्र सेवा दल आल्यानंतर माझा एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. विषयाचा नीट अभ्यास करून त्याची मांडणी करण्याची संधी मला आमच्या या राष्ट्र सेवादल मुळे मिळाली आणि खऱ्या अर्थाने माझे सामाजिक परिवर्तन झाले. त्याबद्दल‌ आमच्या राष्ट्र सेवा दल संपूर्ण टीमचा मनापासून आभारी असल्याचे लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले.
या पुरस्काराने नक्कीच मला अजून जोमाने सामाजिक कार्य करण्याची उर्जा मिळाली आहे. तसेच हा सन्मान देऊन माझा सत्कार केला याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अशोक कांबळे पुणे महानगरपालिका यांचे आभार मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x