पुणे

वैक्तिक वादातून आरोपीने केला मित्राचा खून येवलेवाडी येथे घडली घटना कोंढवा पोलिसांकडून आरोपी अटकेत

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये लेप्रसी हॉस्पीटल, येवलेवाडी,पुणे येथे एक अज्ञात इसमाचे शव रक्ताचे थारोळयामध्ये पडलेला मिळाला. मयात इसमाचा खून केल्याचे निदर्शनास येताच कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकारचा मागमुस नसताना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाच्या टिमने प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीचे आधारे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना जेरबंद करण्यात आले आहे. आरोपीने वैयक्तिक वादावादीतून रागाच्या भरात मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी योगेश सुधाकर कांबळे (वय-२२, रा.महादेव मंदीराजवळ येवलेवाडी,पुणे. मुळ गाव रा. क्रांतीनगर,भिमनगर गंगाखेड रोड,ता.जि.परभणी) व विधीसंघर्षग्रस्त बालक (ता.कळमण जि.सोलापुर) यास कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेत भा.द.वि कलम ३०२ नुसार ११२/२०२० गु.र.न अन्वये प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आला आहे.
(विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेत सदर घटनेची माहिती त्याच्या पालकांना देत. विधीसंघर्षग्रस्त बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.)

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२० रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये लेप्रसी हॉस्पीटल,येवलेवाडी,पुणे येथे एक अज्ञात इसमाचे शव रक्ताचे थारोळयामध्ये पडले असल्याची माहिती कोंढवा पोलीसांना मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार व पोलीस शिपाई विकास बांदल हे घटनास्थळी दाखला होत एक मयत इसम जनावराच्या गोठया जवळील पाण्याच्या हौदाजवळील वडाच्या झाडाखाली रक्ताचे थारोळयात खाली पडला असून त्याचे बाजुला लाकडी दांडका व दगड रक्ताने भरलेला दगड आढळून आल्याने सदर घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवत त्यांच्या सूचनेनुसार मयत ईसम अक्षय सुरेश गायकवाड उर्फ बंटी (वय-२७) याची ओळख पाठवून त्याच्या भाऊ अमित सुरेश गायकवाड (रा.पाटील वस्ती,येवलेवाडी,पुणे) याच्याशी संपर्क साधून त्याच्या भावाचे शव कोंढवा लेप्रसी हॉस्पीटल येवलेवाडी कमानी जवळ पडले असल्याचे सांगितले. या घटनेप्रकरणी अमित सुरेश गायकवाड यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द भादवि कलम ३०२ नुसार ११२/२०२० गुरन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, घटनेनंतर मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ सुहास बावचे व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी पुणे शहर सुनिल कलगुटकर यांनी घटनास्थळी दाखल होत तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

मयत ईसमाचा भाऊ अमित सुरेश गायकवाड यांनी सांगितले की,
मयत ईसम अक्षय सुरेश गायकवाड उर्फ बंटी (वय-२७) हा राहत्या घरामधुन शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी दुपारी ११.३० वाजता घराबाहेर पडला त्यानंतर तो रात्री १०.०० वाजता घरी परत आला नसल्याने त्याचे वडील सुरेश गायकवाड यांनी त्याच्या मोबाईल वर संपर्क साधला असता घरी येतो असे सांगितले व तो परत घरी आलाच नाही.

अशाप्रकारे खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांनी लावला छडा..
कोंढवा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींबाबत काही तपास लागत नव्हता सदर गुन्हयातील आरोपीना पकडने जिकरिचे वाटत असल्याने गुन्हयांच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मयत बंटी ऊर्फ अक्षय सुरेश गायकवाड याच्या मित्रांबाबत त्याच्या वडिलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, तो योगश काबंळे या नावाच्या मित्रासोबत अधिक काळ असतो. त्या मित्राचा शोध घेण्याकामी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांना आदेशित केल्यानुसार तपास पथकाचे पोलीस शिपाई अजीम शेख व पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांना त्याच्या बातमीदाराकडून दाखल खुनाच्या गुन्हयातील आरोपी हे सोलापुर येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ता.कळमण,जि.सोलापूर या ठिकाणी पोहोचून दाखल खुनाच्या गुन्हयांतील आरोपी योगेश सुधाकर कांबळे (वय-२२, रा.महादेव मंदीराजवळ येवलेवाडी,पुणे. मुळ गाव रा. क्रांतीनगर,भिमनगर गंगाखेड रोड,ता.जि.परभणी) व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक (ता.कळमण जि.सोलापुर) यांना सापळा रचून ताब्यात घेत कोंढवा पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्यानी सदर गुन्हा हा वैयक्तिक वादावादीतून रागाच्या भरात मित्राचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनिल फलारी, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा महादेव कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार इकबाल शेख, पोलीस हवालदार सुरेश बापकर, पोलीस नाईक – पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, गणेश अगम, निलेश वणवे, कौस्तुभ जाधव, पोलीस शिपाई – अझीम शेख, विकास बांदल यांनी केलेली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 months ago

You have mentioned very interesting details! ps nice web site.Leadership

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x