पुणे

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ केले अपलोड, पुण्यात तिघा आरोपींना अटक पहिला गुन्हा दाखल, पुणे पोलिसांची कारवाई,

चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजेच लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची कुप्रवृत्ती महाराष्ट्रात घर करत असल्याचे दिसून येतेय. पुणे, बीड येथून मागील काही काळात चाईल्ड पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्या गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, याच तपासात पुण्यातील खडक पोलिसांतर्फे तिघांना अटक करण्यात आल्याचे समजतेय. यातील दोघे सख्खे भाऊ असून एक आरोपी हा अल्पवयीन आहे. महाराष्ट्र पोलिसांशी संलग्न असणाऱ्या एका शाखेच्या तपासात ही बाब समोर आली होती, यांनतर संबंधित आरोपींचा आयपी ऍड्रेस ट्रॅक करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,
राज करन सरोज, मनोज सरोज ही भावंडं एप्रिल 2019 पासून आपलीकडी स्मार्टफोनचा वापर करून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ विविध साईट्सवर पोस्ट करत होती तर, अल्पवयीन आरोपी राज पुट्टीलाल हा या कामासाठी आपल्या काकांच्या सिमकार्डचा वापर करत होता. पुट्टीलालच्या मोबाईलवरुन 28 एप्रिल 2019 रोजी लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. याशिवाय, बीड जिल्ह्यात सुद्धा चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी गेल्या महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर सेलकडून राज्यभरात एकूण 27 व्हिडीओवरती कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यात दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न अपलोड करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा टॉप 5 मध्ये समावेश होतो. चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. असं असतानाही अशा घटना सातत्याने समोर येणं हे धक्कादायक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतेय, याप्रकरणी अजूनही गुन्हे दाखल होऊन अटकेची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x