मुंबई : राज्याचे पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांची यांचे स्वप्न असलेल्या मुंबईतील नाईट लाईफला अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.प्रायोगिक तत्वावर मॉल्स, गेटेड कंपाउंड, बीकेसीमधील एक लेन,नरीमन पॉइन्टमधील एक लेन अशा ठराविक भागात हा उपक्रम सुरु होणार आहे.बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबविला जाणार असून, येत्या २७ जानेवारीपासून हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबईतील नाईट लाईफ अर्थात मुंबई २४ तास संकल्पनेला आता मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती दिली.बैठकीत याविषयावर चर्चा करण्यात आल्यानंतर येत्या २७ जानेवारीपासून मुंबईत हा उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.सध्या प्रायोगिक तत्वावर मुंबईतील मॉल्स, गेटेड कंपाउंड, बीकेसीमधील एक लेन,नरीमन पॉइन्टमधील एक लेन अशा ठराविक भागात हा उपक्रम सुरु होणार आहे. बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबविला जाईल.सुरक्षेच्या उपाययोजना, पार्कींग, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आदी सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले की, दुकाने आणि आस्थापना कायद्यामध्ये २०१७ मध्येच सुधारणा झाली. पण त्यावेळी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता मुंबई २४ तासच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरु होत आहे. लंडन येथील नाईट इकॉनॉमी ही जवळपास ५ बिलीयन पाउंडची आहे. ‘मुंबई २४ तास’ उपक्रमामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगार वाढल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. एक्साईज संदर्भातील कायद्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे पब, बार इत्यादी सध्या प्रचलीत नियमानुसार व सध्या निश्चित असलेल्या वेळेतच सुरु राहतील. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथे रात्री येणाऱ्या पर्यटकांना ‘मुंबई २४ तास’मुळे सुविधा उपलब्ध होतील. मुंबई २४ तासमुळे विविध आस्थापना ३ पाळ्यांमध्ये सुरु राहतील. त्यामुळे रोजगारात ३ पट वाढ होईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.