रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
एका युवकाला टिकटॉकचे वेड चांगलेच महागात पडले, त्याचे हे वेड त्याला थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले टिकटॉक व महागड्या फोनची हौस भागविण्यासाठी महागडे कॅमेरे चोरणारा प्रतिक गव्हाणे (वय 19) याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले.
कॅमेराची चोरी करण्यासाठी तो श्रीमंतांच्या लग्नात चांगले कपडे घालून जात होता मेजवानीवर जोरदार ताव मारल्यानंतर फोटोग्राफर कॅमेरा कुठे ठेवतो यावर बारीक लक्ष ठेवत असे फोटोग्राफर वधू-वरांचे जेवणाचे फोटो काढायला गेल्यावर त्याची उर्वरित फोटोग्राफीच्या सामानाची बॅग सोडून तो पोबारा करत होता याप्रकरणी फोटोग्राफर महेश पवार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पवार हे मगरपट्टा सिटी येथे विवाह समारंभ शूटिंग करण्यासाठी गेले होते दरम्यान विवाह सोहळा सायंकाळचा असल्याने लायटिंगच्या झोतात ते आपल्या कामात व्यस्त होते रात्री उशिरापर्यंत बॅग चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही जेव्हा बॅग मिळून येत नाही लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोधाशोध केली तरीदेखील त्यांनी म्हणाली नाही त्या गडबडीत कोणाकडे गेली असे असे वाटल्याने त्यांनी दोन दिवस सगळ्यांकडे चौकशी केली मात्र बॅगेचा शेवटी तपास न लागल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलिसांनी मंगल कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना एक व्यक्ती घाईघाईने बॅग घेऊन जाताना दिसली त्यावरून पोलिसांनी आरोपीचा माग काढून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला टिक टॉक व्हिडिओ करण्याचा मोठा छंद आहे, त्यासाठी तो महागडा कॅमेरा घेऊ शकत नव्हता त्यासाठी त्याने मोठ्या लग्नसमारंभात जाऊन चोरी करण्याची कल्पना पोलिसांच्या नजरेतून सुटू शकली नाही आणि त्याने चोरी केलेली कॅमेऱ्याची बॅग व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, कर्मचारी रमेश साबळे, अनिल कुसाळकर, विजय पवार, ज्ञानेश्वर चित्ते, प्रशांत नरसाळे यांच्या पथकाने केली.
टिकटॉक करण्यासाठी केली महागड्या कमेराची चोरी ; पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद : हडपसर पोलिसांच्या तत्परतेने घटना उघड
Related tags :
Subscribe
Login
0 Comments