रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शनिवार-नारायण पेठ येथील कार्यालयास आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या व महिला अध्यक्षा सिमाताई रामदासजी आठवले आणि भगिनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा गौरव बापट यांनी सदिच्छा भेट दिली.
सिमाताई आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आरपीआयच्या कार्यालयात उदघाटन करण्यात आलेल्या महा इ सेवा केंद्राची देखील पाहणी केली तसेच आरपीआय वकील आघाडी तर्फे चालू करण्यात आलेल्या कायदा मार्गदर्शन केंद्रातील दाखल केसेस ची माहिती घेऊन कामाची प्रशंसा केली.
आरपीआयची सभासद नोंदणी सुरू असून ऍड मंदार जोशी यांना सिमाताई आठवले व प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या सहीने व स्वरदा बापट व युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्रियाशील सदस्यत्व दिले. आणि ऍड मंदार जोशी यांनी पुणे शहरातील पेठे मध्ये आरपीआय आठवले पक्षाचे पाहिले कार्यालय सुरू केल्याबद्द अभिनंदन केले व सिमाताई आठवले म्हणाल्या की मा रामदासजी आठवले साहेबांची ऑटोबॉयओग्राफी निघाल्यास ऍड मंदारभाऊ जोशी आणि या पेठेतील कार्यालय व त्यांचे सोशल इंजिनिअरिंग चे प्रयत्न याची सुवर्ण अक्षरात नक्की नोंद होईल.
या वेळी मा सीमाताई आठवले आणि स्वरदा बापट यांचा शाल आणि संविधानाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ऍड चित्राताई जानुगडे, ऍड शंभवी सावंत, बेला मेहता, रोजगार आघाडीचे अध्यक्ष सुनील जाधव, वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अझीझ शेख पुणे शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रमेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय निमंत्रक ऍड मंदार जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
आरपीआयच्या नेत्या सीमाताई आठवले यांची पुण्यात कार्यालयास भेट ; मंदार जोशी यांच्या कार्याचे केले कौतुक
Related tags :
Subscribe
Login
0 Comments