रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळ या सेवाभावी संस्थेच्या डॉ. दादा गुजर प्राथमिक विद्यामंदिराने आयोजित केलेल्या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पुणे शहरातील २९ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गट क्रमांक १ मध्ये ५ वी ते ७ वी मध्ये ४० स्पर्धक तर गट २ मध्ये ८ वी ते १० वी मध्ये २६ स्पर्धक सहभागी झाले, एकूण ६६ स्पर्धक सहभागी झाले. नगरसेविका उज्वला जंगले यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले.
गट १ मुले प्रथम क्रमांक देवेन मेहता द्वितीय क्रमांक प्रथमेश म्हेत्रे, मुली प्रथम क्रमांक हार्षिता झगडे द्वितीय क्रमांक वैष्णवी मंगरुळे गट २ मुले प्रथम क्रमांक अशिष जैन द्वितीय क्रमांक देवेश मोरे मुली प्रथम क्रमांक गौरी मोरे द्वितीय क्रमांक तृप्ती हिंगणे असे विजेते झाले.
बक्षीस समारंभाचा कार्यक्रम नगरसेविका प्राचीताई आल्हाट यांच्या उपस्थितीत पार पडला स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य मंळाचे सचिव मा. श्री. अनिल गुजर, मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती झरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले
आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ; दादा गुजर प्राथमिक शाळेत उत्स्फूर्त सहभाग
Related tags :
Subscribe
Login
0 Comments