रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
मुंबई (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सडेतोड वंदनिय बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या प्रा. विद्या संतोष होडे यांना २७ फेब्रुवारी २०२० मराठी राजभाषा दिनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर सौ रश्मी ठाकरे, उपनेते उद्योग मंत्री सुभाष देसाई ,खासदार गजानन कीर्तिकर, ॲड. लीलाधर डाके , आनंदराव अडसूळ, अनंत गीते, सिद्धिविनायक न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर, सुशांत शेलार उपनेत्या मीना कांबळे, पुणे महिला आघाडी संपर्कप्रमुख तृष्णा विश्वासराव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनानेते कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, स्पर्धा समन्वयक मारुती साळुंखे व प्रवीण पंडित यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.राज्याच्या कानाकोपऱ्यातून ३४७ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दिनांक १० ते १२ फेब्रुवारी या दरम्यान पु.ल. देशपांडे अकादमी मुंबई येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या.
वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम प्रा.विद्या संतोष होडे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित ; हडपसर च्या विद्या होडेंचे सर्वत्र कौतुक
Related tags :
Subscribe
Login
0 Comments