रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे : (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, महाराष्ट्र आरोग्य मंडळ या सेवाभावी संस्थेच्या डॉ. दादा गुजर इंग्रजी माध्यम, महंमदवाडी या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन २८ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडले. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.रेणु व्यास, जैवतंत्रज्ञान विज्ञान आणि संशोधन विभाग प्रमुख, एमआयटी – एडीटी विद्यापीठ लोणीकाळभोर, यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन संस्थेचे सचिव, अनिल गुजर व मुख्याध्यापक प्रकाश भापकर यांनी केले.
Bitcoin is a digital currency that operates on a decentralized network and uses public-key cryptography to send transactions over the Bitcoin blockchain without the need for a central authority.