रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
हडपसर परिसरांत गेल्या रविवार पासुन नगरसेवक योगेश ससाणे स्वत: माईक स्पीकर व एइडी व्हॅन घेऊन सोसायटी, हिंगणेमळा, ससाणेनगर, काळे बोराटे नगर मधील गल्ली, वस्ती, सोसायटी
मध्ये जाऊन कोरोना व्हायरस बाबत नागरिकांमधये जनजाग्रुती करीत केली आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका, मनपा दवाखाने – नायडू हाॅस्पीटल, कमाल नेहरु दवाखाना येथे कोरोना वर मोफत उपचार व तपासणी चालु आहे, लहान मुले व जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, पुणे महापालिका व स्वत योगेश ससाणे सेवेसाठी २४ तास उपलब्ध आहेत, सॅनिटायझर व मास्क च्या मागे लागण्यापेक्षा हातरुमाल व साबन वापरावा, लहान मुलांना मोकळा वेळ आहे म्हणून पालकांनी मुलांना मोबाईल व गेम खेळायला लावण्या पेक्षा मुलांना आपल्या इतिहासाची पुस्तके आणुन देऊन त्यांना वाचण्याची आवड निर्माण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
अशा प्रकारे “सुचना “ वजा “दवंडी “ स्वतः नगरसेवक योगेश ससाणे सकाळी तीन तास व रात्री ६ ते १० पर्यंत जागोजागी जाऊन करीत आहेत.
सर्व ठिकाणी नागरिक त्याच्या या उपक्रमाचे नागरिक कौतुक करीत आहेत.
पंडीत जवाहरलाल नेहरु भाजी मंडई मध्ये देखील आज नागरिक व व्यापारी बांधवा मध्ये जनजाग्रुती केली तसेच हडपसर भाजी मंडई पुढील ३१ मार्च पर्यंत प्रत्येक दोन दिवस सलग चालु ठेऊन एक दिवस बंद करण्याचा निर्णय व्यापारी व योगेश ससाणे यांनी घेतला आहे, तशी सुचना मनपा उपायुक्त माधव जगताप यांना नगरसेवक ससाणे यांनी दिली आहे व नागरिकांना आवाहन करून नागरिकांनी बाजार बंद बाबत नोंद घेण्याची विनंती केली आहे. पुढील दोन महिन्यांचे नियोजन नागरिकांनी करावे असे आवाहन नगरसेवक योगेश ससाणे यांनी केले आहे.
शनिवार दि २१ मार्च मार्केट चालु
रविवार दि २२ मार्च मार्केट बंद
सोमवार दि २३ मार्च मार्केट चालु
मंगळवार दि २४ मार्च मार्केट चालु
बुधवार दि २५ मार्च मार्केट बंद
गुरुवार दि २६ मार्च मार्केट चालु
शुक्रवार दि २७ मार्च मार्केट चालु
शनिवार दि २८ मार्च मार्केट बंद
रविवार दि २९ मार्च मार्केट चालु
सोमवार दि ३० मार्च मार्केट चालु
मंगळवार दि ३१ मार्च मार्केट बंद
या प्रमाणे भाजी मंडई चे चालु-बंद चे नियोजन ठरवले आहे
हडपसर परिसरात कोरोना विषयी जनजाग्रुती ; नगरसेवक योगेश ससाणे यांचा पुढाकार ; पुढील दोन महिन्यांचे नियोजन महत्वाचे – ससाणे
Related tags :
Subscribe
Login
0 Comments