पुणे

राज्यातील वकिलांना शासनाकडून मदत मिळावी ; ॲड.संजय सावंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे : महाराष्ट्र राज्यातील ज्युनियर वकिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मी ॲड.संजय सावंत पाटील आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश मा. सहसचिव म्हणून तसेच इंडियन ओसनिक पार्टी महाराष्ट्र प्रदेश मा. अध्यक्ष म्हणून पदभार निभाहुन काम पाहिले आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था व संघटना (भारतीय मिडीया फाऊंडेशन, अँन्टि करप्शन कमिटी, शिवक्रांती युवा परिषद, माहिती सेवा समिती) मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटी मध्ये गेल्या 15 वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे.

कोरोना व्हायरस (COVID-19) या संसर्गजन्य रोगांमुळे जगभर , भारतभर व तसेच आपल्या महाराष्ट्र भर हाहाकार माजला आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण भारतभर संचार बंदी घातली आहे. महाराष्ट्रात ही आपण संचार बंदी लागू केलेली आहे. संचार बंदी साठी सर्व थरातील जनता सुध्दा प्रतिसाद देत आहे व घरी थांबत आहे. त्यामुळे कोणासही आप- आपले व्यवसाय करणे शक्य होत नाही. खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील सर्व न्यायालये बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील वकीला पैकी सुमारे दहा टक्के पेक्षा जास्त वकील हे नव्याने वकिल व्यवसायात सुरुवात करणारे असुन, पाच वर्षापेक्षा कमी कालावधीत काम करणाऱ्या वकीलांना कामकाज बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. जास्तीत जास्त वकील शहरी विभागात वास्तव्य करत असुन महिन्याचा घरभाडे तसेच ऊध्दर निवाहाचा संपूर्ण खर्च खुप मोठा आहे. त्या करिता त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणे खुप आवश्यक झालेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन बार कौन्सिल आँफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यातील सर्व नविन वकीलांना मदत मिळावीअसे सामाजिक कार्यकर्ता ॲड. संजय सावंत पाटील यांनी निवेदनना द्वारे विनंती केली आहे.

महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्यातील पाच वर्षापेक्षा कमी काळासाठी वकीली व्यवसाय करणाऱ्या सर्व वकील बंधु भगिनीना, महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून, यापुढील तीन महिन्याचे करिता, प्रत्येकी दरमहा किमान रुपये पाच ते दहा हजार दरम्यान देण्यात यावे. या निवेदनाचेहिंदू- हृद्यसम्राट आदरणीय मा.बाळासाहेब ठाकरे साहेब विचारांना प्रेरीत असणारे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्वव ठाकरे आपण सर्व नविन वकीलांना न्याय मिळेल अशी अशा बाळगतो.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Very energetic article, I loved that a lot. Will there be a
part 2?

9 months ago

Hello Dear, are you in fact visiting this web page regularly,
if so then you will definitely obtain nice knowledge.

7 months ago

You have a knack for writing engaging content. This post kept me hooked till the end. Well done!

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x