हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडपसरच्या लोकांनी आजवर संयम ठेवला असल्याने कोरोना अवाक्यात होता आगामी आठ दहा दिवस अतिशय महत्वाचे असून या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असे आवाहन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या लॉक डाऊन ला चांगला प्रतिसाद मिळाला होता, म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास यश आले, पोलीस बांधवांनी मोठ्या प्रमाणात काम केले व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चाप बसविला मात्र काही लोकांनी शासनाच्या लॉक डाऊन ला हरताळ फासला व ग्रुप ने बाहेर पडले आहेत, सय्यदनगर येथे एक कोरोना रुग्ण सापडला असून त्यावर उपचार सुरू आहेत, काही लोकांना तपासणी साठी नेले आहे, असे सांगून आमदार चेतन तुपे पुढे म्हणाले लॉक डाऊन आपल्या आरोग्यासाठी व भविष्यासाठी आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघात झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत हे प्रसार वाढला की रोखणे कठीण जाईल ही शक्यता लक्षात घेता नागरिकांनी संयम बाळगावा व घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा सुरू असून तेथेही गर्दी करू नये, रेशन दुकानात माल वाटप सुरू झाले आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांच्याबाबत खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार म्हणून आम्ही पाठपुरावा करीत आहोत तोही प्रश्न लवकरच सुटेल.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिक बंधू भगिनींना आवाहन करत आहे की हा विषाणू आहे त्यामुळे आपण घरात आपल्या कुटूंबात बसा, विनाकारण घराबाहेर पडू नका, संशयित कोणी आढळल्यास महापालिकेला कळवा जेणेकरून वेळीच कार्यवाही करता येईल.
आपल्यासाठी हा कठीण काळ आहे पण आपला संयमच यावर मात करू शकतो म्हणून आपल्या मुलांना बाहेर जाण्यापासून रोखा परिसरात गर्दी करू नका, व पोलिसांना सहकार्य करा या दक्षता घेतल्यास आपण यावर विजय मिळवू शकतो.
कोरोना बाबत सोशल मीडिया मध्ये कोणत्याही पोस्ट करू नका अधिकृत पणे शासनाकडून माहिती दिली जाईल. तरी नागरिकांनी घाबरून ना जाता एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन ही आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले आहे.
शासनाला सहकार्य करा, लॉक डाऊन पाळा संयम सोडू नका, कोरोना विषाणूविरोधी लढा द्या आमदार चेतन तुपे पाटील यांचे आवाहन
Related tags :
Subscribe
Login
0 Comments