रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे (प्रतिनिधी)
देशात व राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना पोलिस प्रशासन व वैदकीय इतर यंत्रणा आपल्या कर्तव्यात कसूर करत नाही त्यामुळे सगळीकडे त्यांचे कौतुकनहोत आहे, मात्र जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांचे आरोग्य धोक्यात असून याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे, डॉक्टर, नर्स पोलीस अधिकारी, कर्मचारी, यंत्रणेची कौतुक होत आहे, तेवढ्यात एक यंत्रणा त्यातून दुर्लक्षित राहिली ते म्हणजे शिक्षक कर्मचारी यंत्रणा.
जे शिक्षक आज पुणे शहरात व उपनगरात घरोघरी जाऊन कोरोना कोविड 19 सर्वेक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
कोरोना व्हायरस भीतीदायक वातावरणात नागरिकांचा आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीबद्दल पाहण्याचा, वागण्याचा दृष्टिकोन हा निश्चितच समाधानकारक नसला तरी चांगले कमी व वाईट जास्त अशा सर्व गोष्टींचा अनुभवाचा सामना करत सर्व मनपा शिक्षक कर्मचारी अत्यंत जबाबदारीने आपले काम करत आहेत आणि विशेष बाब म्हणजे यामध्ये 80 टक्के महिला शिक्षक भगिनी आहेत जे आपला जीव धोक्यात घालून महापालिकेने व शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडत आहेत.
शिक्षकांच्या आरोग्याकडे शासनाने लक्ष द्यावे
कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर शासन व महापालिका विविध उपाययोजना करीत आहे, मनपाचे शिक्षक घरोघरी कोरोना सर्व्हे करत असताना त्यांच्या जीविताला धोका आहे, सगळीकडे दुर्लक्षित असलेल्या शिक्षकांच्या आरोग्याची जबाबदारी व काळजी शासनाने घ्यावी तसेच या शिक्षकांचे पण कौतुक व्हावे.
श्रीमती सुनंदा जाधव
निवृत्तसेवा मुख्याध्यापिका