पुणे (प्रतिनिधी)
पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून कोरोनाच्या उद्रेकामुळे काही भाग “सील” करण्यात आले आहेत. संचारबंदी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांनी पुणेकरांना घरीच थांबा असे आदेश दिलेले आहेत. असं असतानाही काही जण बेफिरीकरपणे बाहेर फिरत आहेत. पोलिसांनी हडपसर भागात गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या किंवा उगाच फिरणाऱ्या 48 जणांना पोलिसांनी पकडले. या सगळ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बेफिकीर नागरिकांना पोलिसांनी उठाबशाही काढायला लावल्या. पुणे पोलिसांनी शहराच्या इतर भागातही विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.
हडपसर पोलिसांनी गुरुवारी पहाटे सिरम आणि ग्लायडिंग भागात मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या ४८ नागरिकांना पकडले. त्यानंतर त्यांना रस्त्यावरच उठाबशा काढायला सांगितल्या. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारची कारवाई लॉकडाऊन काळात सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच व्यायाम करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुण्याच्या विविद भागात नागरिक सकाळी आणि सायंकाळी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामध्ये तरुणांसोबतच जेष्ठ नागरिक, महिला आणि मुलींचा लक्षणीय सहभाग आहे. यामुळे पोलिसांनी पहाटेपासून वर्दळ होण्याची शक्यता असलेल्या भागात गस्त घालायला सुरुवात केली होती. सकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी हडपसर भागात येऊन घराबाहेर पडलेल्यांविरोधात कारवाई केली.
रोखठोक महाराष्ट्र फ्लॅश न्युज… मॉर्निग वॉकला गेले, अन पोलिसांच्या ताब्यात सापडले ; हडपसर मध्ये 48 जणांविरोधात गुन्हा दाखल
Related tags :
Subscribe
Login
0 Comments