महाराष्ट्र

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश….. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक संस्थांनी पत्रकारांना सर्वोतपरी मदत करावी ; ऑल इंडिया जर्नालिस्ट अससोसिएशन ने केली मागणी

मुंबई (प्रतिनिधी)
राज्यात अनेक करोनाचे  हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स लोकांपर्यत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार कॅमेरामन आणि फोटोग्राफेरलाही  करोना साथीने गाठले आहे. पोलीस डॉक्टर्स नर्सेस यांच्या बरोबर आता पत्रकार कॉरोनच्या टप्प्यात आले आहेत.  माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या  तपासणी मोहिमेनंतर मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कुठल्या हि परिस्तिथीत पत्रकारांना मुक्त संचार करावा लागतो.’ कोरोना’पार्श्वभूमीवर शासनाने पत्रकारांना सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे दिल्ली चे  अध्यक्ष अशोकजी वानखेडे यांनी केली आहे.
पत्रकार फोटोग्राफर जीवधोक्यात घालून पोलीस आणि डॉक्टरांबरोबर काम करत आहे, जीवाला बरेवाईट झाल तर शासनाने त्याच्या कुटुंबियाला एक कोटी ची मदत जाहीर करावी अशी मागणी
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे यांनी  केले आहे.
महाराष्ट्रामधील सर्व पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी, स्यानिटायजर्स, पी.पी. ई किट व मास्कचे वाटप, विमा संरक्षण तसेच पत्रकारांना आवश्यक अन्न धान्याचेही वाटप होणे गरजेचे आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन देखील आपल्या परीने पत्रकारांना मदत करण्याचे काम करीत आहे. परंतु शासनाकडून पत्रकारांच्या संदर्भात गंभीर होण्याची गरज आहे. अशी मागणी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन पुणे शहर आणि पुणे  जिल्हा  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त तसेच महापौर पुणे ह्यांना मागणी केली आहे. तसेच पत्रकारांना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of


0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x