रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर/पुणे (प्रतिनिधी)
कोरोना व्हायरस मुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना रोजगार अभावी नागरिक हतबल झाले आहेत, या परिस्थितीत माळवाडी परिसरात बंडू तुपे व मित्र परिवाराने स्वखर्चातून नागरिकांना धान्य वाटप करून दिलासा दिला. एक हात मदतीचा देऊन एक घास माणुसकीचा भरविल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे व हडपसर उपनगरात कोरोना ग्रस्त संख्या पाहता येथे लॉक डाऊन लवकर संपेल अशी चिन्ह नाहीत, प्रभाग क्रमांक 22 मधील माळवाडी परिसरात गोरगरीब व मजूर आणि मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहेत, रोजगार गेल्याने अनेकांना सध्या खाण्याची आबाळ आहे या परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बंडुशेठ केशव तुपे यांच्या नेतृत्वाखाली माळवाडी मधील राजश्री शाहू सोसायटी, हौद परिसर, भैरवनाथ चौक, जवळील सुमारे 200 घरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या उपक्रमात श्री बंडुशेठ तुपे युवक प्रतिष्ठान, राहुल तुपे, ओंकार तुपे, ऋषीकेश तुपे, शंकर तुपे, मंगेश तुपे, प्रमोद साळवे, प्रशांत उभे , पिंटु दौंडकर, सुरेश साठे, विनय चांदणे,सत्यवान ननावरे, तुषार जाधव, विकी तुपे यांची मोलाची साथ लाभली. यव उपक्रमाबद्दल नागरिक व महिलांनी समाधान व्यक्त केले.
माळवाडी परिसरात घरोघरी पुरवठा करणार…
पहिल्या टप्प्यात माळवाडी मधील काही भागात गरजे नुसार धान्य वाटप केले आहे, पुढील आठवड्यात माळवाडी, डीपी रोड, व जवळील भागात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे, एक रुग्ण वारला तेथे औषधे वाटप केले आहे, जेथे अत्यंत गरज आहे तेथे माळ पुरविला आहे, अडचणीत असलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला आहे, मानवतेच्या प्रति असलेली आस्था लक्षात घेऊन मदत वाटप होईल.
बंडुशेठ केशव तुपे
सामाजिक कार्यकर्ते