पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पीएम फंडात ; पुणेकरांच्या भावनांची केली फसवणूक, पालिका सत्ताधारी करतेय राजकारण : आमदार चेतन तुपे यांची टिका

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश….
भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पीएम फंडात
पुणेकरांच्या भावनांची केली फसवणूक, पालिका सत्ताधारी करतेय राजकारण
आमदार चेतन तुपे यांची टिका
पुणे (प्रतिनिधी)
केंद्राने राज्याला हक्काचे पैसे न देता सापत्न वागणूक दिली, त्यातच भाजप नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पीएम फंडात देऊन पुणेकरांची फसवणूक केली आहे, पुणेकर या नगरसेवकांना माफ करणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांवर टिका केली.
आमदार चेतन तुपे म्हणाले, पुणे शहरातील भाजप नगरसेवकांनी त्यांचं मानधन पीएम केअर फंडा ला दिले, एकीकडे पुण्याचे आयुक्त सीएसआर फंडातून मदत मिळविण्यासाठी आवाहन करत आहेत
अशा परिस्थितीत पुणेकरांचे कष्टाचे घामाचे टॅक्स रुपी पैसे पुणेकरांसाठी न वापरता इतरत्र वापरणे योग्य नाही आम्ही सातत्याने कोरोनाच्या मध्ये राजकारण नको आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना केला पाहिजे व पुणेकरांच्या साठी अधिक काम करून या संकटातून पुणे शहराची सोडवणूक झाली पाहिजे अशी भूमिका मांडत आलो आहोत.
परंतु भाजपाने महाराष्ट्रात मात्र सातत्याने या प्रश्नावर गलिच्छ राजकारण सुरू ठेवलेल आहे आणि आज पुण्यात तर निंदनीय राजकारणाचा कळस पाहण्यात आला आहे.
असे सांगून तुपे पुढे म्हणाले, आम्ही सातत्याने नगरसेवकांच्या निधीतून पुणेकरांसाठी औषधे, मास्क, अन्न, स्वच्छतेची उपकरणे, केमिकल घ्यावीत ही मागणी करत आलोय परंतु याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजप पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत
पंतप्रधान निधीला पैसे देण्यापेक्षा हे पैसे पुणेकरांच्या हितासाठी वापरले असते तर जास्त योग्य झाले असते केंद्राला पैसे देऊन आपल्याला ज्या पुणेकरांनी निवडून दिलं ज्यांनी पुण्याची सत्ता दिली त्या पुणेकरांशी प्रतारणा केली त्यांच्यावर अन्याय केला आहे
केंद्र सरकार आपल्या कडून पैसे घेतोय परंतु केंद्राची वागणूक महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्नपणाची आहे हे उघडउघड दिसून येतंय केंद्र सरकार मदत करताना महाराष्ट्राशी दूजाभाव करत आहे हे सर्वसामान्य माणसांना कळून चुकलंय अशा परिस्थितीत हे पैसे आपल्या पुणेकर जनतेसाठी वापरणं हे सत्ताधारी भाजपचं काम होतं परंतु अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करायची सवय लागल्यामुळे त्यांनी असं कृत्य केलेला आहे याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो.
चेतन विठ्ठल तुपे
आमदार
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x