नवी दिल्ली, दि. १२ –
कोरोना महामारीमुळे विस्कटलेल्या आर्थिक घडीला बुस्टर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. जीडीपीच्या १० टक्के रक्कम कोरोनाच्या लढाईसाठी वापरण्यात येणार आहे. कोरोना भारतासाठी एक संधी घेवून आला असून आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा ही पंतप्रधानांनी केली.
आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. ते म्हणाले कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनापासून वाचायचं आहे आणि पुढे देखील जायचं आहे. यापूर्वी एवढं मोठं संकट बघितलं नव्हतं. आपल्याला हार मानून चालायचं नाही. जगातलं सर्वात उत्तम टॅलेंट भारताकडे आहे. आपण सर्वोत्तम ते सर्व करू शकतो. आपण ठरवलं तर भारताला काहीच अशक्य नाही. भारताची संकल्पशक्ती देशाला आत्मनिर्भर बनवू शकते. जीवन आणि मृत्यूच्या लढाईत भारताकडून मोठ्या अशा आहे. आज भारतात रोज २ लाख पीपीई किट १ लाख ९५ मास्क तयार होत आहे. कोरोना भारतासाठी एक संधी घेवून आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचसूत्री सांगितली. अर्थव्यवस्था, पायाभूत विकास, यंत्रणा, मागणी हे पंचसूत्री त्यांनी सांगितली. संघटीत व असंघटीत वर्गाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी, प्रामाणिकपणे कर भरणार्या मध्यमवर्गीयांसाठी, देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या मजूर कामगारांसाठी हे पॅकेज असणार आहे. आपल्याला हार मानून चालणार नाही. कोरोना संकट काळात गरिबांच्या शक्तीच दर्शन घडलं. याचबरोबर तळागळातल्या वर्गाला सोसावं लागलं, असेही ते म्हणाले. पुढच्या लॉकडाऊनसंदर्भात १८ मे पूर्वी कळवण्यात येईल असेही ते शेवटी म्हणाले.