पुणे (प्रतिनिधी)
संपुर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आलेले आहे या काळात संपुर्ण महाराष्ट्रात लॉक डाउन जाहीर केलेला होता याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नागरिकांची वाहने नियमभंग केल्याने पोलिसांनी जप्त केलेली आहेत शासनाने या वाहनचालकांना दंड माफ करून वाहने सोडून द्यावीत अशी मागणी आर.पी.आय आठवले वकील आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, लॉक डाऊन काळात नियाबाह्य वाहने रस्त्यावर आणली म्हणून पोलिसांनी कारवाई करून वाहने जावोत केली आहेत, कायद्याच्या दृष्टीने हे योग्यच होते, परंतु या लॉक डाऊन च्या काळात सर्वांचेच उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झालेला असून ते जगण्यासाठी झगडत आहेत तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वकील आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की सदर जप्त केलेली वाहने ही कोणताही दंड न आकारता त्या वाहन मालकाला योग्य ती समज देऊन सोडून द्यावीत. आधीच नागरिकांना उत्पन्न नाही त्यात हा दंड आणि दंडासाठी रक्कम नसल्याने कामावर जाणे मुश्किल, अशी अनेकांची परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या मागणीचा सहानभूती पूर्वक विचार होऊन जप्त वाहनांनचा दंड माफ करून ती सोडण्याचा आदेश आपणा कडून लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी आरपीआय वकिल आघाडीचे राष्ट्रीय निमंत्रक अॅड.मंदारभाऊ जोशी, पुणे अध्यक्ष अॅड. चित्राताई जानुगडे, पुणे कार्याध्यक्ष अॅड.आनंद कांबळे यांनी केली आहे. निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, व परिवहन मंत्री यांना दिले आहे.
Facebook Page Link
https://www.facebook.com/112080646962699/posts/158242672346496/