रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश….
लॉक डाऊन मोडला तर मिळेल प्रसाद…..
अखेर हडपसर मध्ये एस आर पी एफ चे जवान दाखल..
लॉक डाऊन पार्श्वभूमीवर हडपसर मध्ये झाले संचलन
पुणे (प्रतिनिधी)
हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हडपसर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पोलिसांची जरब राहावी, नागरिकांनी घराबाहेर पडून नये या उद्देशाने 24 तास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत पथसंचलन केलं.
सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलिस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. “भारत माता की जय’, “वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला.
या संचलनाची सुरवात तुकाईदर्शन, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, गाडीतळ परिसरातून झाली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात त्याचा समारोप झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले.
“नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे, तसेच आपले विविध सण घरामध्ये बसूनच साजरे करावेत. कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सतत रस्त्यावर येऊ नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
https://www.facebook.com/112080646962699/posts/159057652264998/