रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…..
कोरोनाची लागण होत असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांत तणाव
कोरोना वाढतोय त्यातच लॉक डाऊन अन ड्युटीचा ताण
पुणे ः प्रतिनिधी
मागिल काही दिवसांपासून परप्रांतीयांना गावी पाठविण्यासाठी त्यांचे अर्ज भरण्यापासून त्यांना रेल्वेमध्ये बसवून देण्यापर्यंतच जबाबदारी पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पोलिसांची बायपास झाली आहे, अनेकांना गंभीर आजार आहेत. त्यांना लाईट ड्युटी देणे अपेक्षित आहे. मात्र, सुरुवातीला काही दिवस दिली मात्र, त्यानंतर तीही बंद केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.
पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा, गुन्हेगारी, केसेस डिटेक्ट करणे, बंदोबस्त अशा अनेक व्यापामुळे कामाचा ताण वाढत आहे. दररोज दोन-तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय तणावखाली वावरत आहेत. हा प्रकार भयानक आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे, सर्व आयुक्त निवृत्त झाल्यावरच बोलतात, सेवेत असताना मात्र गप्प का असतात, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे, अशी टिपण्णीही काही अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, गर्दी करणार नाही, यासाठी चोवीस तास पहारा पोलीस देत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी केल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा बारा तासांची ड्युटी केल्यामुळे त्यांच्यावर ताण वाढला आहे. बारा तास रस्त्यावर उभे राहायचे आणि पुन्हा घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करण्यासाठी दोन तासाचा वेळ लागत आहे. त्यामुळे पोलीस खात्यात नोकरी करावी की नाही, असा प्रश्न पडला असल्याचे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मागिल काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 12 तासांची ड्युटी केली होती. त्यामुळे अनेक पोलिसांनी समाधान व्यक्त केले होते, मात्र, ते समाधान जास्त काळ टिकले नाही. पुन्हा बारा तासाची ड्युटी केली आहे. उन्हाचा कडाका आणि कोरोनाची भीती अशा कात्रीत पोलीस कर्मचारी सापडले आहेत. गर्दी, अपघात आणि इतरही घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी आठ तासाची असावी, अशी मागणी तज्ज्ञ मंडळींकडून केली जात आहे.
रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश….. कोरोनाची लागण होत असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांत तणाव; कोरोना वाढतोय, त्यातच लॉक डाऊन अन ड्युटीचा ताण
Related tags :
Subscribe
Login
0 Comments