पुणे

Rokhthok_Big_Breking_News “या” घटनेने पिंपरी चिंचवड हादरले पिंपरी : मित्रासोबत शतपावलीसाठी गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

पिंपरी/ पुणे : – मित्रासोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या तरुणाला भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाची धडक बसली. यामध्ये या तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री चिंचवड येथे घडली आहे. परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दिपक सुधाकर गायकवाड (वय-32 रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी सौरभ दत्ता गायकवाड (वय-20 रा. वेताळनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. याप्रकरणी लखन प्रताप थोरात (वय-20) याने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक आणि त्याचा मित्र शंकर हे दोघे रात्री दहाच्या सुमारास शतपावली करण्यासाठी पवनानगर परिसरात आले होते. शंकर हा पदपथावरून तर दिपक हा रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाची धडक दिपकला बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालक सौरभ गायकवाड याला अटक करुन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की मयत दिपक याला शंकर याने ढकल्याने तो रिक्षाच्या समोर आला. त्यामुळे त्याला रिक्षाची धडक बसली. मात्र, दिपक पदपथाच्या कडेने चालत असताना रिक्षा चालक सौरभ हा रस्ता सोडून पदपथाशेजारून रिक्षा का चालवत होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच दिपक गंभीर जखमी झाला असताना त्याचा मित्र शंकर याने त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी घरी जाऊन आंघोळ करून कपडे बदलून तो इमारतीच्या खाली आहे. त्याच इमारतीत राहणाऱ्या दिपकच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती का दिली नाही.असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हा अपघात नसून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी दिपकच्या नातेवाईकांनी केली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी नातेवाईकांना दिले. या प्रकरणाचा तपास चिंचवड पोलीस करत आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x