महाराष्ट्र

Tik Tok पडले बंद: स्टार झाला उध्वस्त; दोन्ही बायकांना फुटले अश्रू, टिकटॉकच्या माध्यमातून केली ३० लाखांची कमाई

टिकटॉकनं कितीतरी जणांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं. चाहते मिळवून दिले. त्याचबरोबर पैसाही. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचं एक वलय तयार झालं होतं. पण, २९ जुलै रोजी केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला आणि सगळ्या टिकटॉक स्टार चिंतेत पडले. टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले दिनेश पवार हे त्यापैकी एक. दोन बायकांसह राहत असलेल्या पवार यांच्या कुटुंबाला टिकटॉक बंद करण्याच्या निर्णयाचा धक्काच बसला. इतकच काय, तर “आम्ही उद्ध्वस्त झालो, ही बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या अशी प्रतिक्रिया टिकटॉक स्टार दिनेश पवार यांनी व्यक्त केली.

गलवान व्हॅलीतील संघर्षावरून भारत-चीन यांच्यातील संबंध ताणले गेलेले असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काही चिनी अॅप देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं २९ जुलै रोजी ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे टिकटॉकवरून प्रसिद्धीस आलेल्यासाठी मोठा झटका होता. या निर्णयानंतर धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध टिकटॉककर दिनेश पवार यांच्याविषयीचं वृत्त द प्रिंटनं दिलं.

मोदी सरकारच्या टिकटॉकवरील बंदीच्या निर्णयानंतरच्या प्रतिक्रियेविषयी बोलताना दिनेश पवार म्हणाले,”आम्ही उद्ध्वस्त झालो, पण आम्हाला याचीही जाणीव झाली की, यात फक्त आम्हीच नाही. टिकटॉकवर बंदी आणल्याची बातमी बघून माझ्या दोन्ही इतरांप्रमाणेच ढसाढसा रडल्या. या बंदीच्या निर्णयामुळे आमच्यासारखे लाखो लोक दुखावले गेले आहेत. मात्र, आता आम्ही यू ट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं दिनेश पवार म्हणाले.

दिनेश पवार हे नव्वदच्या दशकातील बॉलिवूड सिनेमातील गाण्यावर नृत्य करून टिकटॉक व्हिडीओ बनवायचे. यातून त्यांनी ३० लाख रूपयांची कमाई केली आहे. पण, दिनेश पवार यांनी ३० लाख रुपये मिळाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आम्हाला काहीही पैसे मिळायचे नाही. पण त्यामुळे आम्हाला प्रसिध्दीची हौस पुर्ण करण्यासाठी मदत झाली, असं त्यांचं म्हणणं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x