Uncategorized

अजित पवारांचा मोठा निर्णय : पुण्यात Coronaviurs ला रोखणार हे 4 अधिकारी

पुणे, 06 जुलै : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यात कोरोना रोखण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) या सर्व क्षेत्रात उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी करणा-या शासकीय तसेच खाजगी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणं. या लॅबमध्ये कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणं. कोरोना ( कोव्हीड-19) टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीतील कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूबाबत ज्या पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणा-या सर्व व्यक्तींना शोधून काढणे व आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्याकडे कोविड-19 विषाणू बाधित सर्व रुग्णांना वेळेवर बेड मिळणे आवश्यक असून रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. तसेच रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी व डॅशबोर्डचे संनियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. तसेच हॉस्पिटलमधील बेडचे सुयोग्य पध्दतीने नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कृषि आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे कोरोना ( कोव्हीड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी काम करीत आहेत. परंतु त्यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पध्दतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
8 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Standing work is possible and good for your health! The benefits are huge: you burn fat, your back is straight, and your blood circulation is aided because you tend to move.
https://www.fezibo.com/collections/standing-desk

1 year ago

An adjustable desk is a height-adjustable desk that can be switched between different heights according to the needs of the user. In recent years, adjustable desks have become one of the most popular furniture in homes and offices due to their unique height-adjustable features.
https://www.fezibo.com/collections/height-adjustable-desk

1 year ago

The L-shaped standing desk is a standing desk with an L-shaped design, which can be placed in a corner or on the side of a room to provide more space for use and work area. It combines the health benefits of a standing desk with the practicality of an L-shaped table for environments such as offices, studios and home offices.
https://www.fezibo.com/collections/l-shaped-standing-desk

1 year ago

A standing desk with drawers is a desk with height adjustable features and drawers. Compared with traditional desks, it is more user-friendly, comfortable and practical. Standing desks with drawers can help workers maintain a standing or sitting posture at work, thereby reducing the negative impact of prolonged sitting on physical health.
https://www.fezibo.com/collections/standing-desk-with-drawers

1 year ago

The standing desk has the advantages of reducing body pressure, improving work efficiency, adapting to various office environments, increasing the plasticity of the desktop, novel and easy to match, etc., so it is a very practical and recommended office furniture. If you need to sit and work in front of the computer for a long time, choosing a high-quality standing computer desk can bring you a better working and learning experience and protect your health.
https://www.fezibo.com/collections/standing-computer-desk

10 months ago
7 months ago

Comment here

8
0
Would love your thoughts, please comment.x
()
x