बनकर विद्यालयातील कोव्हिडं 19 स्वब सेंटरमुळे पूर्वभागातील कोरोनाचा फैलाव थांबण्यास होईल मदत असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले .
माजी महापौर नगरसेविका वैशाली बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यातून कै रामचंद्र अप्पा बनकर विद्यालयात हडपसर पूर्व भागासाठी कोव्हिडं 19 स्वब टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले.
यावेळी उदघाटक म्हणून आमदार चेतन तुपे हे बोलत होते.
याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका पूजा कोद्रे, माजी नगरसेवक सुनील बनकर, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, मनोज घुले, संजीवनी जाधव, सागर राजे भोसले, विजय मोरे, डॉ शंतनू जगदाळे, ऋषीद बनकर, विठ्ठल विचारे, प्रदीप क्षीरसागर, मनपा अधिकारी काळे मॅडम, श्री. वायदंडे,
अभिजित भुजबळ, श्री.घनवट आदी उपस्थित होते .
नागरिकांनी कोरोनाला न घाबरता दक्षता घेऊन दोन हात करायला शिकावे, महाविकासआघाडी सरकार कोरोनाच्या या संकटात जनतेच्या पाठीशी आहे, सर्वतोपरीचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी शासन,आरोग्य यंत्रणा, पोलीस यांना सहकार्य करावे असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या आयोजक, माजी महापौर नगरसेविका वैशाली बनकर यांनी यावेळी बोलताना सांगितले, कै रामचंद्र अप्पा बनकर विद्यालयात 195 संशयित रुग्णांकरिता विलगिकरन कक्ष सुरू करण्यात आला असून सातत्यानं आयुक्त प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून कोव्हिडं 19 स्वब टेस्ट सेंटर पूर्व भागाकरिता मंजूर करून आणले आहे, याचा लाभ हडपसरवासीयांना होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.