पुण्यातील कोंढवा परिसरात राहणार्या एका सराईत गुन्हेगाराचा, त्याचा राहत्या घरात घुसून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घनश्याम पप्पू पडवळ असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम पप्पू पडवळचा व्याजाचा धंदा होता. शिवाय, तो एक सराईत गुन्हेगार देखील होता. यापुर्वी ही त्याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.
आज घनश्याम पडवळ याच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर शस्त्राने अनेक वार केले. यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
600 euro kaç tl