मुंबई – राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, असेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
शरद पवार म्हणाले कि, आपण सर्व पहिले दोन महिने स्वस्थपणे घरामध्ये बसून होतो. बाळासाहेबांची कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. ते काय दिवसभर घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे असे नाही. अनेक वेळेला ते दिवस दिवस घरातच घालवायचे, पण ते घरात असतानासुद्धा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करून आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे बाळासाहेबांनी शिकवले होते. म्हणून या दोन महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण होते.
तसेच, आपण घराच्या तर बाहेर पडायचे नाही. पण ज्या दिशेने आपल्याला जायचयं त्या दिशेने जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे. ते बाळासाहेब करायचे आणि त्याची आठवण या कालावधीमध्ये मला अधिक झाली, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.