मुंबई

#Covid19 – कडक भूमिका घ्यावी लागेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिक कारणाशिवाय मास्क न वापरता आणि नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत गर्दी करत आहेत, अशी परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले. व्यापक सर्वेक्षण करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच करोनाची साखळी तोडणे हे प्रमुख आव्हान असल्याचे पवार यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयांचा दोन दिवसांत निर्णय
कोणती शासकीय कार्यालये सुरू राहणार, कोणती कार्यालये बंद राहणार याबाबतचे आदेश दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर परवानगी देण्यात आलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये किती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल याची माहिती या आदेशात असेल.

पोलिसांची परवानगी आवश्‍यकच
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. ऑनलाइन पासेस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कॅन्टोन्मेंटचाही समावेश
लॉकडाऊनमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे क्षेत्र, कॅन्टोंन्मेंट, शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश राहील. या हद्दीमध्ये तळेगाव, हिंजवडी आणि चाकण यांचाही समावेश असल्याने या ठिकाणी लॉकडाऊन असेल.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात करोना प्रसार नियंत्रणात येत नसल्याने पुणे आणि पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दि.23 जुलै मध्यरात्रीपर्यंत तो सुरू राहील. करोनाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या लॉकडाऊनची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या पहिले पाच दिवसांत म्हणजे दि. 18 जुलैपर्यंत फक्‍त दूध आणि औषधांच्या विक्रीला परवानगी असेल. दरम्यान नागरिकांना भाजीपाला, किराणा खरेदी तसेच अन्य अत्यावश्‍यक कामांसाठी शनिवार (दि.11), ते सोमवार (दि.13) असे तीन दिवस मिळणार आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x