मुंबई

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 71 वर्षांच्या होत्या.

नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. सत्यनारायण या 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या पहिल्या निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले.

नीला सत्यनारायण कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिकाही होत्या. प्रशासनासोबतच लिखाणावरही त्यांची मजबूत पकड होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तके लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x