पुणे (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २२ जुलै रोजी असणारा वाढदिवस दरवर्षी उत्साहाने विविध सामाजिक उपक्रम राबवून राज्यभरात साजरा केला जातो. यंदा मात्र महाराष्ट्र कोरोना संसर्गामुळे उदभवलेल्या महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहे, सामाजिक भान व काळाची गरज लक्षात घेऊन आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकारातून ४५ लाख रुपयांचे व्हेंटिलेटर लोकार्पण करण्यात येणार आहेत.
कोविड १९ या महामारीमुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा जसे बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडत आहे. या आजारात श्वसनाचा त्रास होत असल्याने व्हेंटिलेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे,
ही गरज ओळखून हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी यंदा अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. नेत्याचा सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे चालवत आमदार चेतन तुपे यांनी ४५ लाख रुपये किमतीचे सहा व्हेंटिलेटर्स हडपसर मतदारसंघातील रुग्णालयांना देण्याचे ठरवले आहे.
बुधवारी या व्हेंटिलेटर्सचा लोकार्पण सोहळा आहे अतिशय साध्या पध्द्तीने नोबल हॉस्पिटल व कोंढवा येथे होणार आहे. मगरपट्टासिटी आणि अमानोरा टाऊनशिप तसेच तुपे परिवार यांच्या सहकार्यातून व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. अशा पध्द्तीने व्हेंटिलेटरवर देणारे चेतन तुपे एकमेव आमदार असतील हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा असल्याचे नोबलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने यांनी सांगितले.
कोविड- १९ चा मुकाबला करण्यासाठी या व्हेंटिलेटर्सची अतिशय आवश्यकता आहे. आणि या आवश्यकतेच्या काळात असा अनोखा, लोकहिताचा उपक्रम चेतन तुपे यांनी हाती घेऊन अशा भीषण प्रसंगी रुग्णांना दिलासा दिला आहे.
संकट काळात हडपसरवासीयांसाठी तुपे कुटुंबीय कायम खंबीरपणे उभे राहतात. पूर्वी स्व.विठ्ठल तुपे पाटील होते त्यांचाच समर्थ वारसा पुढे चालवत आमदार चेतन तुपे पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
कोव्हीड १९ तपासणी सेंटर महापालिकेने वाढविले आहेत, तीव्रता कमी असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, पुणे शहर व उपनगरात व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत, व्हेंटिलेटर अभावी कोणाच्या जीविताला धोका होऊ नये या हेतूने हडपसर विधानसभा मतदारसंघात सहा व्हेंटिलेटर आमदार तुपे पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहेत, अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण केले जाणार असल्याने या उपक्रमाचे कौतुक मतदारसंघातील नागरिक करत आहेत.