पुणे

अवघ्या दोनशे पंचवीस रुपयात मिळणार कोरोना लस सिरम कंपनी व बिल गेट्स फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे (प्रतिनिधी)
सिरम इन्स्टिट्यूटने सामाजिक बांधिलकी जपणार्‍या बिल गेट्स फाउंडेशन सोबतच उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे, या करारामुळे भारतासह अविकसित देशांसाठी या लसीचे तब्बल दहा कोटी डोस निर्माण केले जाणार असून ही लस भारतात सवादोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
सिरम कंपनी विकसित करीत असलेल्या “एक्स्ट्राझेंका” या लसीच्या उत्पादनासाठी इन्स्टिट्यूटने आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार केला आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर भारतासह अविकसित देशांसाठी त्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
2021 पर्यंत हे उत्पादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे बिल गेट्स फाउंडेशन दिलेल्या मदतीमुळे “एक्स्ट्राझेंका” आणि “नोव्हावॅक्स” या लसी सर्वसामान्यांसाठी सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होईल.
गेट्स फाउंडेशन कडून “गावी” ला 1125 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीतून “गावी” कडून सिरमला लस उत्पादनासाठी सहकार्य केले जाईल या आर्थिक मदतीमुळे एका लसीची किंमत अंदाजे दोनशे पंचवीस रुपये पर्यंत म्हणजे तीन अमेरिकी डॉलर असेल असा दावा केला जात आहे, त्यामुळे भारत तसेच आर्थिक दृष्ट्या विकसित नसलेल्या देशातील नागरिकांना ही लस अल्पदरात उपलब्ध होणार आहे फाउंडेशनने भागीदारी करार केल्याने कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या 10 कोटी उत्पादन करण्याची तयारी झाली आहे. भारत तसेच अविकसित देशांतील नागरिकांना त्याचा फायदा होईल 2021 पर्यंत या देशांना लस पुरविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे अशी माहिती सिरम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली.

जगात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावतो आहे या विषाणूच्या विरोधात प्रतिकार शक्ती तयार व्हायला हवी अशा परिस्थितीत रोगप्रतिबंधक लसी चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे आवश्यक आहे भारतासह अन्य गरीब देशांमधील नागरिकांना सुरक्षित अशी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करण्याचे आम्ही खात्री देतो त्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने च्या माध्यमातून आम्ही लाखो नागरिकांच्या जीव वाचू शकतात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
आदर पूनावला
मुख्य कार्यकारी अधिकारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x