पुणे (प्रतिनिधी)
वैदूवाडी येथील झाडे काही अज्ञात लोकांनी तोडली असून यावर कारवाई करण्याबरोबर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी पालिका सहायक आयुक्तांकडे केली आहे.
वैदूवाडी येथील मंदिराजवळ तुकाराम शिंदे व मित्र परिवाराने काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले होते, या ठिकाणी असणारी झाडे 10 फुटापर्यंत वाढली होती काही अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळी मोठी झालेली झाडे बेकायदेशीर पणे तोडली या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वानवडी सहायक आयुक्तांना लेखी निवेदन देऊन बेकायदेशीर झाडे तोडणाऱ्यावर कारवाई करावी व येथे पालिकेच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी तुकाराम शिंदे यांनी केली आहे.
परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले की असे बेकायदेशीर प्रकार घडणार नाहीत व चुकीची कृत्ये करणाऱ्यांना चाप बसेल त्यामुळे महापालिकेने निधीची तरतूद करून तातडीने आमच्या मागणीला न्याय द्यावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.
तुकाराम शिंदे
वरिष्ठ उपाध्यक्ष ओबीसी सेल
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे