पुणे : संभाजी ब्रिगेड पुणे मध्य जिल्हाध्यक्षपदी उत्तम कामठे यांची निवड करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी नियुक्ती पत्राद्वारे त्यांची निवड केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून सामाजिक ते राजकीय प्रवासात उत्तम कामठे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी संभाजी ब्रिगेड हवेली तालुका अध्यक्ष आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये भरीव असे कार्य केले आहे. संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाल्यापासून पुणे जिल्हा अध्यक्षपदी पहिल्यांदाच स्थानिक चेहरा दिल्याने स्थानिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड मध्ये करण्यात आलेल्या फेरबदल मुळे प्रस्थापित पक्षांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही.
संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा निहाय बांधणी करून ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे कार्यकर्ता’ असे संघटन उभे करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसह सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढविणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेड मध्ये खूप मोठी संधी असून राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या मागे न लागता वैचारिक परिवर्तनातून राजकीय परिवर्तनासाठी सदैव सज्ज असणाऱ्या संभाजी ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष उत्तम कामठे यांनी केले.
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी उत्तम कामठे यांची निवड झाल्याबद्दल प्रभाकर कोंढाळकर, महेश टेळेपाटील, हनुमंतराव मोटे,कैलास आवारी,संदिप लहाने, ज्योतिबा नरवडे, मारुती काळे, पप्पू पांडव, योगेश शिंदे, गणेश भगरे,अजय पवार,धनंजय जाधव, ओमकार इरकर,सागर आलाट, प्रशांत धुमाळ, शरद गोरे, गोरक्ष निम्हण,संतोष कोंडे,शेखर जगताप,सिद्धार्थकोंढाळकर,पांडुरंग सोंडकर,निलेश सूर्यवंशी,नितीन कामठे,प्रफुल्ल गुजर,रामदास खुटवड,अंकुश पारवे,संतोष पावले,अनंत थोरात,घनश्याम कुंजीर,रोहित नलावडे, स्वाती टेळे,सुरेखा जुजगर, संपदा बामणे, वैशाली खैरे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.