पुणे

सिरम इन्स्टिट्यूट कडून नोबलला दोन हायफ्लो मशीन डॉ.सुरेश जाधव व डॉ.भूषण मानगावकर यांचा पुढाकार

पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका जाणवतो ही गरज लक्षात घेऊन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या वतीने  नोबल हॉस्पिटलला दोन हायफ्लो न्यासल कॅनूला
मशीन भेट दिल्या.
नोबल हॉस्पिटलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, संचालक डॉ.एस.के.राऊत यांनी मशीन स्वीकारल्या. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ.सुरेश जाधव, ह्यूमन रिसोर्सेस रमेश पाटील, संचालक समीर माने, महेंद्र इंगे, डॉ. भूषण मानगावकर, कामगार प्रतिनिधी अजित खैरे, एस.रॉयल, प्रवीण घुले, अजित भिंताडे, दशरथ कटके, श्री.उंदरे आदी उपस्थित होते.
नोबल हॉस्पिटलच्या वतीने आभार पत्र देऊन डॉ.सुरेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

“कोव्हीड 19” रुग्णांची संख्या व व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन दोन मशीन सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने नोबल हॉस्पिटलला देण्यात आल्या आहेत. रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या मशीन मुळे होईल असे मत डॉ.सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.
“कोव्हीड 19” रुग्ण वाढत आहेत, व्हेंटिलेटर शिल्लक नाही मग रुग्ण दगावतात हे लक्षात घेऊन सिरम इन्स्टिट्यूट ला विनंती केल्यावर त्यांनी साडेसात लाखाच्या दोन मशीन नोबलला देणगी स्वरूपात दिल्या याचा लाभ रुग्णांना होईल असे मत नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ.सिद्धराम राऊत यांनी व्यक्त केले.
हायफ्लो या मशीन ऑक्सिजन पुरविण्याचे काम करतात ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन क्षमता कमी त्यांना मशीनचा वापर होईल, खर्च ही कमी येतो त्यामुळे या मशीन रुग्णांसाठी वरदान ठरतील.
डॉ.सुरेश जाधव व डॉ.भूषण मानगावकर यांच्या पुढाकारातून हा सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x