हडपसर(प्रतिनिधी)
कर्मवीरांनी समाज जीवनातूनच खरे शिक्षण घेतले. शिक्षणाच्या संस्काराने माणूस घडतो. बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे याची जाणीव कर्मवीरांना होती. कर्मवीर सामाजिक भान जपून विषमतेवर प्रहार करीत होते. बालपणापासूनच अन्यायाच्या विरोधात बंड करून उठत .ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम कर्मवीरांनी केले. शिक्षणातून गोरगरिबांचे जीवन कर्मवीरांनी फुलवले. वसतिगृहातील प्रत्येक मुलगा स्वतःचाच आहे असे मानणारे कर्मवीर थोर समाज सुधारक होते. रयते मधला प्रत्येक विद्यार्थी हा कर्मवीर अण्णा यांचा वारसदार आहे असे विचार मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मांडले .ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऑनलाईन कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन (दादा) तुपे होते .ते म्हणाले की ,कर्मवीर अण्णांचे व्यक्तिमत्व उत्तुंग आहे. बहुजन समाज आज कर्मवीर अण्णांच्या त्यागामुळे सर्व क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे. बहुजनांच्या जीवनात शिक्षणामुळे परिवर्तन घडून येत आहे. असे ते म्हणाले. एस. एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. रयत ही एक सामाजिक समतेची प्रयोगशाळाच आहे असे ते म्हणाले .मा. दिलीप आबा तुपे सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा, मा. अशोक आप्पा तुपे, कॉलेज विकास समिती सदस्य, उपप्राचार्य डॉ. महादेव जरे ,सर्व विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव यांनी केले .आभार उपप्राचार्य डॉ. एम.एल. डोंगरे यांनी मानले.
It’s awesome to visit this web site and reading the views of all friends regarding this
article, while I am also keen of getting know-how.
I don’t even know how I ended up here, but I thought this
post was good. I do not know who you are
but certainly you’re going to a famous blogger if you aren’t already 😉 Cheers!
This info is priceless. How can I find out more?
Thanks in favor of sharing such a good thinking, post is pleasant,
thats why i have read it fully
Wow! Finally I got a website from where I be able to truly get useful facts
concerning my study and knowledge.