मुंबई (प्रतिनिधी)
अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईच्या पाली हिलमधील बंगल्याचं बांधकाम मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी पाडलं होतं.या कारवाईविरोधात कंगनाने कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
“बाबरी खटल्यापासून ते मराठी अस्मितेसाठी लढण्यापर्यंत अनेक खटले आपण अंगावर घेतले आहेत.आपलं शहर आणि राज्याच्या अभिमानासाठी लढा देण्यापासून ही गोष्ट रोखणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील बंगल्याचं केलं होतं.
मराठी अस्मितेसाठी लढत राहणार -संजय राऊत

Subscribe
Login
0 Comments