पुणे

अखेर भाजपच्या “या” माजी आमदारांसह 41 जणांना जामीन मंजूर

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि पाच नगरसेवकांसह 41 जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला 41 जणांना झालेली अटक व त्यांना देण्यात आलेल्या 14 दिवसांची पोलीस कोठडी वरून भाजप अंतर्गत अस्वस्थता होती अखेर जामीन मिळाल्याने आज सायंकाळपर्यंत यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
शासकीय कामकाजात अडथळा आणल्या याप्रकरणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती बुधवारी या सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमानुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, वीरसेन जगताप व मनीषा कदम यांच्यासह 41 जणांना अटक करण्यात आली होती गेल्या चार दिवसांत पासून सर्व पदाधिकाऱ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने अटक झाल्यानंतरही पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया उमटली नव्हती यासंदर्भात पक्षातही अस्वस्थता होती. पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला.
दरम्यान यासंदर्भात बोलताना भाजपाचे पुणे शहर प्रभारी गणेश बिडकर म्हणाले आमची संघटना अभेद्य आहे पक्षात आम्ही कुणालाही वाळीत टाकले नाही या प्रकरणात माजी आमदार टिळेकर तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यांच्या जामीनसाठी आम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील होतो पक्ष संघटना म्हणून आम्ही एकत्र आहोत सर्वांना जामीन मिळून परतल्यानंतर या आंदोलनासंदर्भात राजकीय भूमिका आम्ही पक्ष म्हणून स्पष्ट करणार आहोत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x