मुंबई

प्रशासनाने सतर्क राहावे;नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार पुणे विभागातील अतिवृष्टीसह पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

 

पुणे, दि. १६ ऑक्टोबर – जिल्ह्यासह पुणे विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज विविध प्रशासकीय यंत्रणांकडून घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

दरम्यान सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, त्याचीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.

पुणे येथील विधान भवन सभागृहाच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासह पुणे विभागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (व्हिसीव्दारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप, ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे,पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. या वादळी पावसात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तसेच घरांची पडझड, मालमत्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इतर मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x